औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शन | Aundha Nagnath Jyotirling Darshan
बारा ज्योतिर्लिंग हे भारतातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके या ठिकाणी शिवांची पूजा केली जाते.
औंढा नागनाथ हे त्यापैकी एक आहेत. अनुज्ञान नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहेत
12 ज्योतिर्लिंगांपैकी हा आठवा (आद्या) मानला जातो म्हणून हा तीर्थयात्रा केंद्र महान महत्व आहे.
असे मानले जाते की, धर्माराज (पांडवपैकी सर्वात मोठे) याने हेस्तिनापूरला 14 वर्षांपासून निर्वासित केले होते.
नागनाथ मंदिराला उत्तम कोरीव काम आहे. मंदिर हेमाडपंती वास्तुशिल्प आहे आणि सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रावर स्थित आहे.
शिवरात्री आणि विजयादशमी वर मोठ्या संख्येने यात्रेकरू या मंदिरात येतात.
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असे म्हणतात,
या शहराचे सध्याचे नाव हे औंढा असून पूर्वीच्या काळी याचे नाव हे दारुकावण असे होते, हे ठिकाण महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात आहे,
मंदिराचा अती प्राचीन इतिहास :-
या ज्योतिर्लिगाच्या स्थापनेत दारुका नावाच्या एका दैतिनी चा इतिहास सांगला जातो ,
प्राचीन काळात दारूका नावाची एक राक्षसीण होती, तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. पार्वती तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाली आणि तिला एक वन दिले. हे वन फार चमत्कारिक होते. दारूका जिकडे जाईल तिकडे ते तिच्यामागे जात असे. या वनात दारूका आपला पती दारूकसोबत राहत होती. दारूका आणि दारूक या दोघांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. हे दोघे सर्व लोकांचा अमानुषपणे छळ करत होते. अनेक ब्राह्मणांना यांनी ठार मारले होते. काही ब्राह्मणांना बंदी बनवले होते.
बंदी केलेल्या ब्राह्मणांमधील एक ब्राह्मण शिवभक्त होता. कारागृहात तो शंकराची उपासना करू लागला. ही गोष्ट जेव्हा दारूक राक्षसाला समजली तेव्हा त्याने ब्राह्मण शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला. काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शंकराची उपासना सुरू केली. दारूकाला हे समजताच तो धावत आला. त्याने लाथेने पूजा मोडुन टाकली. तो ब्राम्हणांना ठार मारु लागला. त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला. त्याच क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारूक आणि दारूका राक्षसांचा वध केला. त्यानंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की, मी येथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रुपाने कायमचे वास्तव्य करेल. तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवती जे अरण्य आहे त्याला दारुकावन असे म्हणतात.
नंतर कालांतराने या ठिकाणी एक मोठे आमर्दक सरोवर तयार झाले.
आणि ज्योतिर्लिंग हे त्या सरोवरात समाविष्ट झाले .
पांडवकालीन इतिहास :-
युग गेले आणि आले द्वापरयुाग श्री कृष्णाचे जन्म्युग ,
पाच पांडव हे कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली. यादरम्यान पांडव भारतभर फिरले. फिरता–फिरता ते या दरुकवनात आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय होती ती गाय रोज तेथील सरोवरात उतरून दूध सोडत होती . असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गाईच्या पाठोपाठ त्या सरोवरात तो उतरला आणि त्याला महादेवाचे दर्शन झाले मग त्याला समजले की ती गाय रोज त्या शिवलिंगावर दूध सोडत होती. मग पाचही पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले . आणि विर भीमाने आपल्या गदा प्रहरणे त्या सरोवराच्या चारही बाजूंनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले श्री कृष्णाने त्यांना त्या शिवलिंग विषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे . मग पाच पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असे अखंड दगडाचे मंदिर बांधले .
यादवकालीन इतिहास :-
आणि पुन्हा एकदा कालांतराने हे सध्याचे मंदिर सेउना (यादव) घराण्याने हेमाडपंथी शैलीने बांधले होते आणि ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते हे मंदिर सात मजली दगडाच्या इमारतिचे होते .
इ.स.1600 नंतरचा इतिहास :-
नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने या मंदिराच्या इमारती ध्वस्त केल्या होत्या , औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिरचे शिखर हे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिराचे शिखर पुन्हा बांधले.
आणि ते आजही आपल्याला पाहायला भेटते.