Talathi Bharti Update 2023 - तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता
राज्यातील ३६ जिल्ह्यांत सुमारे साडेचार हजारांहून अधिक तलाठ्यांची नियोजित पदभरती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही पदे भरण्यासाठी राज्यातील ११ आदिवासी जिल्ह्यांतील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त आहे. याबाबत राज्यपालांनी २०१९ मध्ये आदेश काढून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. राज्य शासनाने पेसाबाबत गेल्या महिन्यात अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहे. या भरतीबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत. याबाबत मार्गदर्शन शासनाने मागविले आहे. त्यानंतर या पदभरतीबाबत कार्यवाही होईल. दरम्यान, समांतर पातळीवर पदभरतीकरिता परीक्षेसाठी टीसीएस कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही केली जाईल. - आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, भूमिअभिलेख विभाग