पशुसंवर्धन विभाग भरती 2023 | zp bharti latest | talathi bharti 2023 | zp bharti | talathi bharti
(१) पशुसंवर्धन विभाग भरती 2023
(२) वित्त विभागाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदभरती वरील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णय दिनांक १७/०१/२०२३ अन्वये सन २०१७ मधील पदभरती रद्द करण्यात येवून, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार वाढीव पदांचा समावेश करुन नवीन पदभरती करणेबाबत निर्देश देण्यात आले असून, या अनुषंगाने पदभरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी IBPS कंपनीची निवड करण्यात आली आहे.
(३) जाहिरात क्र. १३/२०१९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्राप्त शिफारशींनुसार शासन आदेश दिनांक ०८/०२/२०२२ अन्वये एकूण ४२८ उमेदवारांना पशुधन विकास अधिकारी (गट-अ) पदावर नियमित नियुक्ती देण्यात आलेली आहे.
(४) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) संवर्गाची ५६ रिक्त पदे आणि पशुधन विकास अधिकारी (गट-अ) संवर्गाची २९८ रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत दिनांक २६/१२/२०२२ रोजी चाळणी परीक्षा झालेली आहे. या अनुषंगाने आयोगाद्वारे उमेदवारांची निवड होवून विभागास शिफारस प्राप्त झाल्यानंतर सदरहू रिक्त पदे भरण्याचे संकल्पित आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत पशुधन पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील व वरिष्ठ लिपिक (गट-क) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता IBPS (इंस्टीटयुट ऑफ बँकीग पर्सोनल सिलेक्शन) कंपनीची निवड करण्यात आली असून, पदभरतीची कार्यवा सुरु आहे.