कृषी सहायक पद भरती | 1439 पदांसाठी भरती | zp bharti latest update | talathi bharti 2023
कृषी विभागाचा पदांबाबतचा आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करून कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येईल. कृषी सहायकांची एकूण १,४३९ पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल.
zp bharti latest update
या संदर्भात १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. विधान परिषदेत सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
talathi bharti 2023
यावर मंत्री सत्तार म्हणाले, राज्यात कृषी विभागात कृषी सहायकांची ११ हजार ५९९ पदे मंजूर असून, फेब्रुवारी २०१३ अखेरपर्यंत ९ हजार ४८४ पदे भरलेली आहेत तर २ हजार ११५ पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांच्या एकूण मंजूर पदसंख्येचा विचार करता, हे रिक्त पदांचे प्रमाण १८ टक्के आहे. कोविड काळात वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर निर्बंध होते.
vanrakshak bharti update
३१ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाने हे निर्बंध शिथिल करण्यात आले आणि सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादिपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. पेसा कार्यक्षेत्रातील पदभरतीसंदर्भात राज्यपालांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. उर्वरित पदभरतीची कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे मंत्री म्हणाले. 'कृषी सहायक" हे पदनाम बदलून ते 'सहायक कृषी अधिकारी' असे करण्याची मागणी आहे. याबाबत संबंधित संघटना आणि राज्य शासन यांची बैठक घेऊन येत्या १५ दिवसात कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पदोन्नतीबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहितीही उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. यावेळी अभिजीत वंजारी, विक्रम काळे, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रा. राम शिंदे यांनी उपप्रश्न विचारले होते.