आफ्रिकेतला चित्ता भारतीय जंगलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी


Wednesday, January 29, 2020

ADVERTISEMENT
आफ्रिकेतला चित्ता भारतीय जंगलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी


आफ्रिकेतला चित्ता भारतीय जंगलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

दक्षिण आफ्रिकेतला चित्ता हा वन्यजीव भारतात आणण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे.
भारतातल्या योग्य अधिवासात आफ्रिकेतला चित्ता आणता येणार आहे. आपल्या चपळतेसाठी ओळखला जाणारा चित्ता भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाला आहे, त्यामुळे आफ्रिकेतल्या नामिबिया देशामधून चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्या. बी. आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी केली.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA)
'टायगर प्रोटेक्शन प्रोग्राम' (व्याघ्र प्रकल्प) नावाचा एक कार्यक्रम 1973 साली भारत सरकारने WWF या जागतिक संस्थेच्या सहकार्याने सुरू केला. भारतातल्या व्याघ्र प्रकल्पांच्या पुनर्गठित व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना डिसेंबर 2005 मध्ये झाली.
‘वन्यजीव संरक्षण कायदा-1972’ मध्ये 2006 साली दुरूस्ती करण्यात आली ज्यामुळे संकटात सापडलेल्या वाघांच्या (तसेच वाघ या प्रजातीतले इतर पशू) संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणारी ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण’ ही संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. पर्यावरण व वन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेची स्थापना करण्यात आल

Reactions